News

जळगावात धोका वाढला; करोनाचे ३० बळी, रुग्णसंख्या २४४ वर

जळगाव:जळगाव जिल्ह्यात आज करोनाचे आणखी ७ रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २४४ वर पोहचली आहे. जिल्ह्यातील करोना मृत्यूदरही मोठा असून आतापर्यंत ३० जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. त्यानुसार करोना सदृष्य लक्षणे असलेल्या ९८ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. या सर्व स्वॅबचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ९१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ७ जणांचे अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, भुसावळ येथील दोन, भडगाव येथील एक व खामगाव (जि. बुलडाणा) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागातील आहेत त्या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच फिजिकल डिस्टन्सिंग व अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबई: करोनामुळं मृत्यू झालेल्या बेस्ट कामगारांच्या वारसांना नोकरी

४५ रुग्णांची करोनावर मात

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रुग्णांची संख्या २४४ इतकी झाली असून त्यापैकी ४५ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर ३० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटलांचं भाजमधील योगदान शून्य; खडसेंचा हल्लाबोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.