News

भारतीय खेळाडूंना करोनाचा मोठा धोका, क्रीडा संकुलात एकाचा मृत्यू

खेळाडूंच्या सरावाला लवकरच सुरुवात होईल, असे म्हटले जात होते. पण एका क्रीडा संकुलात जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे, त्यामुळे भारतीय खेळाडूंना करोनाचा मोठा धोका असल्याचे म्हटले जात आहे.

लॉकडाऊनमुळे भारताचे काही खेळाडू एका क्रीडा संकुलामध्ये राहत होते. या क्रीडा संकुलात सर्व खेळाडूंसाठी जो जेवण बनवायचा त्या आचाऱ्याचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंचे धाबे दणाणले आहेत.

वाचा- करोनाबाबत चीनले जगाला फसवलं, लपवली ही मोठी गोष्ट

भारतीय खेळाडूंना न्याहारीपासून जेवणापर्यंत जे काही लागत होते, ते हा आचारी बनवत होता. या आचाऱ्याच्या संपर्कातही काही खेळाडू आलेले असतील. त्यामुळे आचाऱ्याच्या मृत्यूमुळे खेळाडूंनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

नेमके घडले तरी काय…
बंगळुरु येथे क्रीडा प्राधिकरण केंद्र आहे. येथे भारताच्या पुरुष आणि महिलांचे हॉकी संघातील खेळाडू थांबलेले आहेत. त्याचबरोबर बरेच अन्य खेळाडूही इथेच राहत आहेत. या केंद्रातील आचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही खेळाडूंसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार या आचाऱ्याबरोबर एक बैठक झाली होती, त्यावेळी ३० व्यक्ती उपस्थित होत्या.

वाचा- क्रिकेटपटू बनला देवदूत, दहा हजार मजूरांना केली मोठी मदत

या गोष्टीचा क्रीडा प्राधिकरणाने विरोध केला आहे. प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” जेव्हा आचाऱ्याॉबरोबर बैठक झाली तेव्हा फक्त पाच लोकं उपस्थित होते. या सर्वांना आता क्वारंटाइन केले आहे. त्याचबरोबर ज्या आचाऱ्याचा मृत्यू झाला तो खेळाडूंपासून लांब राहत होता. पण येत्या २४ तासात आम्ही सर्वांची करोना चाचणी करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.