News

पॉझिटिव्ह न्यूज! धारावीत दिवसभरात फक्त १८ नवे करोनाबाधित सापडले

मुंबई: करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज फक्त १८ नवे करोनाबाधित सापडले आहेत. दररोज सरासरी ४० रुग्ण सापडत असतानाच धारावीतील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.

धारावीत आज १८ रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णसंख्या १७३३वर पोहोचली आहे. धारावीत आज एका करोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने येथील करोनामुळे दगावलेल्यांची संख्या ७१ झाली आहे. आज माहीममध्येही ४१ रुग्ण सापडले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. तर मृतांची संख्या ९ झाली आहे. माहीममध्ये फिवर कँम्पचं आयोजन केल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणवर रुग्ण आढळले आहेत. यातील बरेचसे रुग्ण हे ब्रीच कँडी आणि रहेजा रुग्णालयातील कामगार असून पोलिस कॉलनीतीलही अनेकांना करोनाची लागण झाल्याचं पालिकेने स्पष्ट केलं. तर दादरमध्ये आज १५ रुग्ण आढळले असून त्यामुळे येथील रुग्णसंख्या ३०९ झाली आहे. दादरमधील मृतांचा आकडा १० झाला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणं महागात पडणार; होणार ‘ही’ शिक्षा

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या जी/ उत्तर विभागात कालपर्यंत २९०० रुग्ण होते. तर ई वॉर्डात २५२८, एफ/उत्तरमध्ये २५१७, एल वॉर्डात २४९५, एच पूर्वेमध्ये २२२१, के पश्चिममध्ये २२१०, के पुर्वेत २१०७ आणि जी/ उत्तरमध्ये २००८ रुग्ण सापडले आहेत.

ठाकरे सरकारचं ‘चलान’ फाटणार का?; गडकरी म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.