News

करोनाचा शॉक; २०० वर्षांची परंपरा असलेली कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर!

न्यूयॉर्क: कपड्यांच्या बाबत जवळपास अमेरिकेच्या सर्व अध्यक्षांची पहिली पसंद असलेल्या २०० वर्ष जुनी ब्रूक्स ब्रदर्सने दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी अर्ज केला आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची शिकार झालेली ही आणखी एक मोठी कंपनी ठरली आहे. आता दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी या कंपनीची धडपड सुरू आहे.

वाचा- आर्थिक संकटात कोणता पर्याय चांगला? पर्सनल लोन की गोल्ड लोन; जाणून घ्या!

ब्रूक्स ब्रदर्सची स्थापना १८१८ साली न्यूयॉर्कमध्ये झाली होती. या कंपनीने दोन जागतिक महायुद्ध, आर्थिक मंदी आणि अन्य कठीण काळाचा यशस्वीपणे मुकाबला केला होता. पण सध्या निर्माण झालेल्या करोना व्हायरस आर्थिक संकटात ब्रूक्स ब्रदर्सचा टीकाव लागला नाही. कंपनीने दिवाळखोरी संरक्षण कायद्याच्या कलम ११ नुसार अर्ज दाखल केला आहे. कंपनीने त्यांचे २००हून अधिक स्टोअर्सपैकी २५ टक्के कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसमुळे किरकोळ विक्रीला मोठा फटका बसला आहे. याआधी ब्रूक्स ब्रदर्सची प्रतिस्पर्धी कंपनी बार्नीज न्यूयॉर्कने देखील दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी अर्ज केला आहे.

वाचा- पैशांची चणचण; ‘SIP’तील गुंतवणुकीचा ओघ आटला

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकटात जे क्रू, निमॅन मार्कस, जे सी पेनीसह अनेक कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. अनेक ग्राह ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे वॉलमार्ट, टारगेट आणि अमेझोन सारख्या इ-कॉमर्स कंपन्यांना फायदा होत आहे. पण ऑफलाइन स्टोअर चालवणाऱ्या कंपन्याचे नुकसान झाले. अमेरिकेत काही प्रमाणात लॉकडाऊन उठवण्यात आला असला तरी लाखो नागरिक अद्याप घरची थांबले आहेत.

वाचा- नवीन आर्थिक घोटाळा; पंजाब नॅशनल बँक पुन्हा हादरली!

अमेरिकेच्या ४० अध्यक्षांनी घातले होते ब्रूक्सचे कपडे

अमेरिकेतील काही भागात करोना व्हायरसची लाट आली आहे. यामुळे अॅपल सारख्या कंपन्यांनी संबंधित भागातील स्टोअर्स पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ब्रूक्स कंपनीला एक ऐतिहासिक परंपरा देखील आहे. अमेरिकेच्या कमीत कमी ४० अध्यक्षांनी या कंपनीचे कपडे घातले आहेत. अब्राहम लिंकन यांची जेव्हा १८६५ साली हत्या झाली होती तेव्हा त्यांनी ब्रूक्स ब्रदर्सचा कोट घातला होता. ब्रूक्स ब्रदर्सचे दोन बटन असलेले सूट अध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांना खुप आवडायचे. त्याचा सांस्कृतीक प्रभाव देखील मोठा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.