News

दबंगगिरी, गँगस्टर आणि अंत…विकास दुबेची कुंडली

कानपूर : कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत मारला गेला. विकास दुबेची कानपूरमध्ये दहशत होती. तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करायचा. जिल्हा स्तरीवरील निवडणूकही तो जिंकला होता. तसेच नेत्यांपासून पोलिसांसोबत त्याची ऊठबस असायची. गेल्या शुक्रवारी कानपूरमध्ये ८ पोलिसांची निर्घृण हत्या केल्यानंतर विकास दुबे पुन्हा प्रकाशझोतात आला. त्यानंतर तो फरार झाला होता. काल, गुरुवारी त्याला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक करण्यात आली.

राजकीय पक्षांशी नाव जोडलं गेलं…

विकास दुबेचा राजकीय पक्षांशी संबंध जोडले गेले. त्याबाबत अनेक दावे करण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. अशाच एका फोटोमध्ये विकास दुबे एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या मंत्र्याच्या बाजूला दिसला होता. काँग्रेसने यावरून आरोप केले आहेत. विकास दुबेला राजकीय संरक्षण दिले होते, असा दावा करण्यात आला. एका दुसऱ्या फोटोत आपली पत्नी ऋचा दुबे हिच्यासाठी मते मागत असल्याचे दिसून येत आहे. तिने घिमऊ येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती आणि ती जिंकूनही आली होती. पोस्टरमध्ये दोन नेतेही सोबत होते. ते आता विरोधी पक्षात आहेत.

गँगस्टर विकास दुबेसह ‘त्या’ सर्व गुंडांचा असा केला एन्काउंटर

विकास दुबेला कशी झाली अटक? संपूर्ण घटनाक्रम वाचा

२००० मध्ये निवडणुकीत जिंकून आला होता

२००० मध्ये विकास दुबे स्वतः शिवराजपूरमधून निवडून आला होता. ही निवडणूक त्याने तुरुंगात असताना लढवली होती. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका हत्याप्रकरणात तो तुरुंगात गेला होता. पोलीस हत्याकांडानंतर तो फरार होता. गुरुवारी अटक केल्यानंतर विकास दुबेच्या आईने प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी तो भाजपमध्ये नाही, तर समाजवादी पक्षात होता, असे त्याची आई सरला देवीनं सांगितलं होतं. त्यावर समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. विकास दुबे पक्षाचा सदस्य नव्हता. त्याच्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले होते. त्याच्या संबंधांचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

६० हून अधिक गुन्हे, पण एकाही प्रकरणात…

विकास दुबेविरोधात ६० हून अधिक गुन्हे दाखल होते. मात्र, एकाही प्रकरणात किंवा हत्या प्रकरणातही त्याला दोषी जाहीर केलं नाही. भाजप नेता संतोष शुक्ला हत्याकांडातील तो प्रमुख आरोपी होता. लोकांमध्ये विकास दुबे या नावाची प्रचंड दहशत होती. पोलीस ठाण्यात शुक्ला यांची हत्या झाली. मात्र, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने विकास दुबेविरोधात साक्ष दिली नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

कानपूर एन्काउंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक

सांगली हादरलं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

तुरुंगात बसून रचायचा हत्येचा कट

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टासमोर पुरावे सादर न केल्याने किवा पुराव्यांअभावी विकास दुबेची सुटका झाली होती. विकास दुबे हा काही काळ तुरुंगात होता. तो तुरुंगात राहून हत्येचा कट रचायचा, असा दावाही त्यांनी केला.

अनेक हत्यांमध्ये आरोपी होता

विकास दुबे कानपूरमधील एका कॉलेजातील व्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेच्या हत्या प्रकरणातील आरोपी होता. त्याच वर्षी त्याने तुरुंगातून रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचला होता. २००४ मध्ये व्यापारी दिनेश दुबे याच्या हत्येच्या घटनेतही त्याचे नाव आले होते. २०१३ मध्ये त्याने दुसरी हत्या केली. २०१८मध्ये आपला पुतण्या अनुरागच्या हत्येतही तो आरोपी होता. विकास दुबे त्यावेळी तुरुंगात होता. मृताच्या पत्नीने विकास आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात तक्रार केली होती. विकास दुबे आणि त्याचा भाऊ दीपू दुबे हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात, असे एका गावकऱ्याने सांगितले. तर त्याचा लहान भाऊ अविनाशची काही महिन्यांपूर्वीच हत्या करण्यात आली होती.

maharashtra times
maharashtra times

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.