News

महेश भट्ट यांना एक ट्वीट पडलं महागात, झाले ट्रोल

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीतील अनेक बड्या स्टारवर निशाणा साधण्यात येत आहे. सध्या सुशांतने आत्महत्या का केली याची चौकशी सुरू आहे. दरम्यान सोशल मीडियावर मात्र घराणेशाहीचा वाद सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या विरोधात आपलं मत मांडलं आहे. तसेच बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही चालते असं अनेकांनी मान्यही केलं. प्रत्येकाचा स्वतःचा असा ग्रुप आहे आणि ते आपल्याच ग्रुपमधील कलाकारांना काम देतात असेही स्टार्सवर आरोप करण्यात आले.

सुशांत आणि रिया चक्रवर्ती दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. एवढंच नाही तर दोघं या वर्षी लग्नही करणार होते. मात्र रियाला सिनेसृष्टीत लॉन्च करणाऱ्या महेश यांनी रियाला सुशांतपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय महेश यांनी आधीच सुशांतसोबत काही वाईट घडणार असल्याची शक्यता वर्तवली होती.

आलियाच्या सिनेमासाठी करणने लावली होती ‘सेटिंग’

कंगना रणौतने साधला निशाणा-

याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतने भट्ट कॅम्पवर निशाणा साधला होता आणि सुशांत आणि रियाच्या नात्यात महेश भट्ट काय करत होते असा प्रश्न तिने विचारला. गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ट्रोल होणाऱ्या महेश भट्ट यांनी शुक्रवारी अजून एक ट्वीट केलं. या ट्वीटलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. अनेक युझर्सने तर ट्विटरवर आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला.

अभिनेत्रीच्या घरात घुसून विनयभंग; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

महेश भट्ट यांनी केलं ट्वीट-

अमेरिकन वकील आणि नेते Adlai Ewing Stevenson यांचं एक कोट महेश भट्ट यांनी शेअर केलं. यात लिहिलं होतं की, ‘स्वातंत्र्याची माझी परिभाषा ही आहे की एक असा समाज ज्यात प्रसिद्ध न होणंही सुरक्षित असलं पाहिजे.’

सोशल मीडिया युझर्सच्या प्रतिक्रिया-

महेश भट्ट यांनी हे ट्वीट करताच काही क्षणांमध्ये व्हायरल झालं. अनेकांनी ट्वीटवर आक्षेपार्ह शब्दात आपल्या प्रतिक्रिया दिल्या. इथे पाहा काही प्रतिक्रिया..

हिंदूंच्या भावना दुखावल्या

दरम्यान, ‘सडक २’ या चित्रपटाच्या पोस्टरवर कैलास मानसरोवर पर्वताचा फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोवर ‘सडक २’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे. हिंदु धर्मात कैलास पर्वताला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान असून याला सडक असं नाव देण्यात आल्यानं आलिया आणि महेश भट्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्तिक आर्यनने रद्द केली चायना प्रोडक्टची डील!

‘सडक २’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच ‘सडक’ चित्रपटाचा ‘सडक २’ हा सिक्वल आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं असून आलियासोबत तिची बहिण पूजा भट्ट चित्रपटात दिसणार आहे. तसंच अभिनेता संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.