News

विकास दुबे एन्काऊंटर बनावट?; मुंबईतील वकील सुप्रीम कोर्टात

मुंबई:कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे याचा आज झालेला एन्काऊंटर बनावट असण्याची शक्यता असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती करणारे पत्र मुंबईतील एका वकिलानं सरन्यायाधीशांना लिहिलं आहे. (Mumbai Lawyer files PIL in Vikas Dubey Encounter Case)

असा झाला विकास दुबेचा एन्काऊंटर; पोलिसांची गाडी उलटली आणि…

कानपूर येथे आठ पोलिसांची निर्घृण हत्या करणाऱ्या टोळीचा प्रमुख विकास दुबे आज पहाटे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याचे इतर पाच साथीदार याआधीच पोलीस चकमकीत मारले गेले होते. हे पाच साथीदार मारले गेल्यानंतर मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी गुरुवारी रात्री ई-मेलद्वारे सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ‘विकास दुबेचे पाच साथीदार चकमकीत मारले गेले असल्यानं त्यालाही मारले जाऊ शकते, अशी भीती उपाध्याय यांनी याचिकेद्वारे व्यक्त केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज सकाळी विकास दुबेच्या एन्काऊनंटरचे वृत्त धडकले.

वाचा: शरद पवारांच्या मुलाखतीची इतकी चर्चा का? हे आहे खरं कारण

दुबे मारला गेल्यानंतर मुंबईतील आणखी एक वकील अटलबिहारी दुबे यांनी आज सकाळीच सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली ही चकमक बनावट असण्याची भीती त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. या चकमकीची चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. थोड्या वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त आहे.

maharashtra times

वाचा: नगरसेवकांच्या घरवापसीचा शिवसेनेचा आनंद ठरला क्षणिक

पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार उलटल्यानंतर उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन दुबे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. एका पोलिसाच्या हातातून हिसकावलेली पिस्तुलही त्याच्याकडे होती. त्याला शरण येण्यास सांगण्यात आलं. मात्र, त्यानं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांच्या या दाव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एन्काऊंटरच्या आधी पोलिसांनी मीडियाच्या गाड्या सचेंडी येथेच थांबवल्या होत्या. त्यांना पुढे येण्यास मनाई केली होती, असा आरोप पत्रकारांनी केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देखील कानपूर येथील पोलीस हत्याकांडापासून ते दुबे एन्काऊंटरपर्यंत सर्वच घडामोडींची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

maharashtra times
maharashtra times

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.