News

वधू पिताच आढळला करोना पॉझिटिव्ह; लग्नाला उपस्थित २०० जणांचा जीव टांगणीला

उस्मानाबादः करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लग्नसोहळ्यांसाठी मर्यादा घालून दिल्या आहेत. ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, असं असतानाही बऱ्याचदा सरकारच्या या नियमांचं उल्लंघन करुन मोठ्या थाटात लग्नसोहळे होत असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना उस्मानाबदमध्येही घडली आहे.

भूम तालुक्यातील राळेसांगवी गावात विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी २०० जणांनी उपस्थिती लावली होती. पण, वधू पितालाच करोनाची लागण झाल्यानं वऱ्हाडी मंडळींमध्ये एकच गोंधळ उडाला. वधू पित्याच्या संपर्कात आलेल्या २४ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आणखी १५ -१७ जणांचा अहवाल येणं बाकी आहे.

वाचाः गणपतीसाठी कोकणात जाता येणार का?; अनिल परब यांची मोठी घोषणा

पोलिसांनी वधू पिता व आयोजकांसह २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असून वधू- वरांच्या प्रकृतीविषयीही अधिक माहिती घेण्यात येत आहे. तसंच, लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या इतर नातेवाईकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर काही नातेवाईकांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभ ठाकलं आहे.

वाचाः महाविकास आघाडीपुढे पुन्हा धर्मसंकट; सांगलीत राजकारण तापले

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यातही एका लग्नसोहळ्यात करोना बाधित रुग्ण आढळल्यानं नवरा-नवरीसह अनेक जणांना करोनाची लागण झाली होती. या कार्यक्रमात ४०० जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.