News

आमदार पळवून न्यायला ती काय बैलजोडी आहे का?; गुलाबराव पाटील यांचा सवाल

जळगाव: महराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला १७० आमदारांचा पाठींबा आहे, यातील ५० आमदार घेवून जायला ती काय बैलजोडी आहे काय?, असा सवाल करतानाच भाजपाने महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहू नये, असा इशारा राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला दिला आहे.

मध्यप्रदेशानंतर आता राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेस सरकार पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राजस्थाननंतर महाराष्ट्रात देखील हा प्रयोग भाजपकडून होईल का? असा सवाल केला असता पाटील यांनी खास शैलीत हा इशारा दिला आहे. मध्यप्रदेशात कॉंग्रेसची संख्याबळ कमी असल्याने सरकार पाडण्यात भाजप यशस्वी ठरले, मात्र राजस्थानमध्ये त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पडण्याचे स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे १७० आमदारांचा पाठींबा आहे. अन् कुणीही पळून न्यायला आमदार काय बैल जोडी आहे का? असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

देव करो फडणवीसांना करोना होवू नये

माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे ‘मला कोरोना झाल्यास शासकीय रुग्णालयातच दाखल करा,असे सांगितल्याच्या मुद्दयावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देव करो फडणवीसांना करोना होवू नये, असे सांगतानाच फडणवीस यांचा शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर विश्वास आहे हेच यातून दिसून येते, असा चिमटाही त्यांनी काढला.

करोना हे सरकारचं नाटक; प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ डेडलाइन

पोलिस प्रशिक्षण केंद्र वरणगावातच

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे असलेले पोलिस प्रशिक्षण केंद्र तेथेच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, तेव्हा या केंद्राचे आदेश मी स्वत: घेवून येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘माझा वाढदिवस साजरा करू नका, शुभेच्छा द्यायच्या असतील तर…’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.