News

मुंबई: वृद्ध महिलेच्या हत्येचं गूढ उकललं; सूनेनंच घेतला जीव

मुंबई: चेंबूरमधील ७० वर्षीय महिलेच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. सासूच्या नावावर असलेल्या फ्लॅट आपल्या नावे व्हावा या लालसेपोटी सूनेनेच तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी सूनेला अटक केली आहे.

चेंबूर टिळकनगर येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय संजनाबाई पाटील यांचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा बनाव सूनेनं रचला होता. मात्र, शरीरावरील जखमा आणि गळ्याभोवतीचे व्रण पाहून वृद्धेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तपासकामाला लागले होते. या प्रकरणी चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सून अंजना पाटील हिनेच संजनाबाई पाटील यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यांच्या नावावरील फ्लॅट आपल्या नावे व्हावा, असे अंजनाला वाटले. फ्लॅटच्या हव्यासापोटी तिनं सासू संजनाबाई यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी अंजना पाटील हिला अटक केली आहे.

दुर्दैवी! बहिणीसोबत घरात खेळत होती ११ वर्षीय मुलगी, अचानक…

सेक्स रॅकेट ‘क्वीन’ सोनू पंजाबन; वाचा क्राइम कुंडली

बहिणीच्या मुलाला घेतलं होतं दत्तक

चेंबूरच्या पेस्टम सागर परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये संजनाबाई राहत होत्या. मुलबाळ नसल्याने त्यांनी बहिणीच्या मुलाला आपल्या मुलासमान मानले होते. हा मुलगा आणि सूनही तिच्यासोबत राहत होते. सोमवारी दुपारी संजनाबाई एकट्याच घरात होत्या. त्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या होता. त्यांच्या अंगावर वार केले होते. त्यांचा गळाही आवळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळं ही हत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्या दिशेने तपास सुरू केला.

सूनेला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले; सासूचा पारा चढला अन्…

पुण्यातील ‘त्या’ खूनाचा अखेर छडा लागला

कपाटातील काही वस्तू होत्या गायब

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. तसेच कपाटातील काही वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज होता. घरच्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज, इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर रहिवाशांची देखील चौकशी केली होती. घरगुती वाद, इमारतीमध्ये राहणाऱ्यांशी भांडण असे काही होते का? याबाबतही चौकशी केली जात होती.

मुलीच्या डोळ्यांदेखत वडिलांची आत्महत्या; कारण वाचून बसेल धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.