News

नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी; शिवसेनेचा पलटवार

मुंबईः नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी बोचरी टीका करणाऱ्या नारायण राणेंवर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे हे आधी वेगळंच बोलतात, नंतर काही बोलतात. त्यांना बोलण्याचा टीआरपी वाढवायचा असतो, त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही उद्योग राहिलेला नाही. राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, त्यामुळं ते काहीही बोलत असतात. अशी टीका गुलाबराव पाटील यांनी राणेंवर केली आहे.

वाचाः आठ दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार; पोलिसांची यशस्वी मध्यस्थी!

नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले? राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं, सेनेत असताना मुख्यमंत्रीपदही दिलं. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

वाचाः भाजपचे शिवाजी महाराजांवरील प्रेम केवळ मतांपुरतेच; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

काय म्हणाले होते नारायण राणे?

‘पैसे कमावणं हा शिवसेनेचा धंदा असल्यामुळे ते काल काय बोलेले आणि आज बोलण्यामध्ये काय बदल करतील सांगू शकत नाही. त्यामुळे नाणारला पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. ८० टक्के म्हणजे १०० टक्केच समर्थन झालं. ८० टक्के समर्थन होत नाही. शिवसेनेचं हे घुमजाव आहे,’ असं नारायण राणे म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.