हिंदू व मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने सोशल मीडियावर वारंवार विधाने केल्याच्या आरोपांविषयी वांद्रे पोलिसांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
‘या एफआयआरनंतर कंगनाने आणखी एक ट्वीट करून ‘पप्पू सेना’ वगैरे शब्द वापरून न्यायालयाचाही अवमान केला. तिला न्यायालयाचाही आदर नाही’, असा आरोप अली यांनी तक्रारीत केला आहे.