News

पेट्रोल-डिझेल; जाणून घ्या आजचा इंधन दर

मुंबई : युरोपात करोनाची दुसरी लाट आल्याने बहुतांश देशांनी पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण सुरु आहे. तेलाचे भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहेत.मात्र असे असूनही देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ३४ व्या दिवशी ‘जैसे थे’च ठेवले आहेत.

‘एसबीआय’ला बंपर नफा ; करोना काळात केली मोठी कमाई!
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी सलग ३४ व्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी महिनाभरापासून देशातील इंधन दर ‘जैसे थे’च आहेत. पेट्रोलियम कंपन्यां या धोरणाबाबत ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

सोने झाले स्वस्त ; कमाॅडिटी बाजारात जोरदार नफा वसुली
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अटीतटीची लढत सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली असून विजयासमीप ते पोहचले आहेत.

आणखी एक पॅकेज लवकरच; अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारची चाचपणी
चीनमध्ये कच्चे तेलाच्या आयातीत पुन्हा एकदा घट झाली आहे. जून महिन्यात चीन दररोज १३ दशलक्ष बॅरल तेल आयात करत होता.हे प्रमाण कमी होऊन ११.२१ दशलक्ष बॅरल इतकं खाली आले आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार ३० ऑक्टोबर रोजी तिथे ८.०१ दशलक्ष बॅरल तेलाचा साठा होता. दरम्यान आज सिंगापूरमधील कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव किंचित वधारला. तेलाचा भाव प्रती बॅरल ०.२७ डॉलरने वाढून ३८.८८ डॉलरवर गेला. ब्रेंट क्रूडचा भाव ०.२५ ने वधारून तो ४०.९८ डॉलर प्रती बॅरल झाला आहे.

US Election Live: अमेरिकेत सत्तांतराची शक्यता! बायडन यांची निर्णायक आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.