News

चौकशीसाठी हजर राहण्यास कंगनाचा नकार; दिलं हे कारण

मुंबईः बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणावत तिच्या वादग्रस्त ट्विटमुळं नेहमीच चर्चेत असते. पण याच वादग्रस्त वक्तव्यांमुळं ती अडचणीत सापडली आहे. जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूनं सोशल मीडियावर वारंवार विधानं केल्या प्रकरणी कंगनाविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून आज कंगनाला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, कंगनानं आज पोलिसांसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे.

सोशल मीडियावर कंगना राणावत हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला १० नोव्हेंबर आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.

वाचाः लोकशाहीला गृहित धरु नका; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत अमृता फडणवीसांचे सूचक ट्विट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी कंगना व रंगोलीला दुसरी नोटिस पाठवली होती. पण कंगनानं या नोटिशीला उत्तर देत भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्यानं पोलिसांसमोर हजर राहू शकणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र, त्यालाही नकार देत त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत हजर राहू शकतो असं उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता कंगना व रंगोली १५ नोव्हेंबरला तरी पोलीस ठाण्यात हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.