News

जाणीवपूर्वक भ्रष्टाचाऱ्याला मंत्री केलं, ही नौटंकी आता चालणार नाही

पाटणाः बिहारचे नवनियुक्त शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी ( mevalal choudhary ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेवालाल यांनी शपथ घेतल्यापासून विरोधी पक्ष आणि आरजेडीने भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून प्रश्न उपस्थित केले होते. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर तेजस्वी यादव ( tejashwi yadav ) यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलीय. तेजस्वी यांनी ट्विटमधून नितीशकुमारांना लक्ष्य केलंय. फक्त एक राजीनामा घेऊन चालणार नाही, असं तेजस्वी यादव म्हणाले.

‘माननीय मुख्यमंत्री, सरकारचे भ्रष्ट धोरण, हेतू आणि नियमबाह्य होणाऱ्या कामांबाबत सावध करणं ही विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. फक्त एका राजीनाम्याने काहीच फरक पडणार नाही. आता तर १९ लाख नोकऱ्या आणि समान काम-समान वेतनसारख्या मुद्द्यांवर सामना होईलच. जय बिहार, जय हिंद.’, असं ट्विट करत तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला.

‘तुमची नौटंकी आणि दुटप्पीपणा चालू देणार नाही’

तेजस्वी यादव यांनी दुसर्‍या एका ट्विटमधून नितीशकुमार यांना इशारा दिला आहे. ‘तुम्ही थकले आहात, हे मी आधीच सांगितलं होतं. म्हणून तुमची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमी झाली आहे. जाणीवपूर्वक मंत्री बनवलं. थ-थू होऊनही पदभार स्वीकारला आणि काही तासांनी राजीनाम्याचं नाटक केलं. खरे गुन्हेगार तुम्ही आहात. तुम्ही मंत्री का बनवलं ? तुमची नौटंकी आणि दुटप्पीपणा चालू देणार नाही?, असं म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केलं.

बिहारमध्ये भाजप मंत्र्यांच्या कार्यालयात दाखल झाले ‘हनुमान’

बिहार शिक्षणमंत्र्यांवर तिसऱ्याच दिवशी राजीनामा सोपवण्याची नामुष्की

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादत आलेल्या मेवालाल चौधरींनी बुधवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली होती. त्याचवेळी मेवालाल चौधरी हे शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे संकेत मिळाले होते. यानंतर मेवालाल चौधरी यांनी आज राजीनामा दिला. सबौरमधील कृषी विद्यापीठात नोकर भरतीत घोटाळा केल्याचा मेवालाल चौधरी यांच्यावर आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.