News

दिवाळी मात्र ह्या आजारानं खाल्ली…विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

मुंबई: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘माझा होशील ना‘ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी प्रेश्रकांचा आवडता बनला आहे. विराजला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ही माहिती त्यानं स्वत:च चाहत्यांना सांगितली होती. त्यानंतर त्याला लवकर बरं होण्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

करोनावर मात केल्यानंतर विराजसनं एक अनोखी इन्स्टा पोस्ट करत, करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगितलं आहे. सोबतच या संपूर्ण काळातला करोनाचा अनुभव कसा होता हे देखील त्यानं सांगितलं आहे.

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज, पण लाइक्सपेक्षा डिसलाइक्सचाच पाऊस जास्त

मालिकेतल्या त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आदित्य कश्यप असं असून, त्याचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चाहत्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, की हाय मित्रांनो, मागचे दहा दिवसांत काही गोष्टी झाल्या. एक म्हणजे मी सोशल मीडियावरून गायब झालो होतो, आणि दुसरं तुमच्या सगळ्यांचे मेसेज आणि कमेंट्सचा भडिमार होत होता. सगळ्यांना उत्तकं देणं शक्य नव्हतं. मला करोनाची लागण झाली होची. पण आता टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. जो त्रास व्हायचा होता तो संपलाय आणि नशिबानं सुट्टीसाठी पुण्याच्या घरीच होतो. दिवाळी मात्र, ह्या आजारानं खाल्ली. पण, आता पुन्हा शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. आणि आपण टीव्हीवर आणि सोशल मीडियावर भेटत राहूच’, अशा आशयाची पोस्ट विराजसनं केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.