News

भीमसागराला बाबासाहेबांनी शिस्त दिल्यानेच हे शक्य झाले: CM ठाकरे

मुंबई:चैत्यभूमी येथे निळा भीमसागर उसळत असे. महासागराला शिस्त लावता येत नाही. पण भीमसागराला बाबासाहेबांनी शिस्त दिली आहे. त्याला चौकट आखून दिली आहे, हे दिसून आले. त्यामुळेच आज आपण या करोना संकटामुळे गर्दी न करता अत्यंत संयमाने अभिवादन करतो आहोत. अनेकांनी चैत्यभूमीवर न येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. जिथे आहेत, तिथून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यासाठी भीमसैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी आणि बांधवांना धन्यवाद देतो’, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. ( Dr. Babasaheb Ambedkar International Research Centre Latest News Updates )

वाचा: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना डांबून ठेवले; राजू शेट्टी यांनी केले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारण्यात येत असून त्याच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेमके आपल्याला कळलेत की नाही हे समजून घ्यावे लागेल. बाबासाहेब एक व्यक्ती होती पण, त्यांचे अनेक पैलू होते. त्यांच्या एका-एका पैलूचा अभ्यास करणे हे एक मोठे संशोधन ठरेल. बाबासाहेबांनी सामाजिक, वैचारिक क्रांती केली. संविधान लिहिले. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यासाठी लढा दिला. पण बेड्या तोडणं. शृंखला तोडणं हे कठीणच होते. पण त्यांनी क्रांतीला योग्य दिशा देण्याचे कठीण कार्यही केले, असे उद्गार मुख्यंत्र्यांनी काढले.

वाचा: भारत बंदचा प्रभाव महाराष्ट्रात किती?; काँग्रेसने केली ‘ही’ मोठी घोषणा

बाबासाहेबांनी एकीकडे परकीयांशीही लढा दिला आणि दुसरीकडे समतेसाठी त्यांचा स्वकियांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. त्यांची ही ज्ञानलालसा अपूर्व अशीच होते. प्रसंगी बाबासाहेबांचे वडील रामजीबाबा मिळतील तिथून पैसे जमवून बाबासाहेबांना पुस्तके विकत आणून द्यायचे. बहिणींचे दागिनेही पुस्तकांसाठी विकले. पुस्तक वाचनाच्या व्यासंगापायी घर विकावे लागले होते. ज्या व्यक्तीला अभ्यास करण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागले. त्याच व्यक्तिविषयीचा अभ्यास करण्यासाठी आज संशोधन केंद्र सुरू करावे लागले आहे. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, हा एक चमत्कारच आहे. या संशोधन केंद्राची कोनशिला अनावरण करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध होते, याचा दाखलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या अर्पणपत्रिका, भाषणांची ‘अक्षरयात्रा’

या केंद्रातील संशोधन उपक्रमात आता लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्सने सहकार्य दिले आहे. डॉ. बाबासाहेब जगभर जिथे जिथे अभ्यासासाठी गेले. त्या संस्था-विद्यापीठांना या आंतरराष्ट्रीय केंद्रांशी संलग्न व्हावे, असे वाटेल असे काम आता आपल्याला करावे लागेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यापुढे डॉ. बाबासाहेब यांच्यासारखे अभ्यासू, विद्वान होणे अशक्य आहे. पण त्यांच्याविषयीचा अभ्यास करून, पुढे जाणारे अभ्यासक, संशोधक येथे तयार व्हावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केला. त्यातून देशाला संविधान दिले. वेगवेगळ्या गोष्टीत विखुरलेल्या आपल्या देशाला संविधान देऊन एकसंघपणाची ताकद काय असते हे दाखवून दिले. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात जन्मला ही खरोखर महानतेची बाब आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या महानतेपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण इंदू मिल स्मारक येथील त्यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करतो आहोत. त्यांच्या पुतळ्याची उंची वाढविता येईल. पण त्यांच्या व्यक्तित्त्वाची उंची आपल्याला गाठता येणार नाही. त्यांच्या योगदानामुळे आपण जगाकडे ताठ मानेने पाहू शकतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत महाराष्ट्र शासन कुठेही कमी पडणार नाही. जागतिक पातळीवर अभिमान वाटेल, असे संशोधन केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिली.

वाचा: शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट; ‘या’ विषयांवर चर्चा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.