News

सूरज पांचोळीने केलं मान्य, आता बॉलिवूडमध्ये कम मिळणं कठीणच

मुंबई- बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली यांने आतापर्यंत फक्त दोन सिनेमांमध्ये काम केलं आहे. आपल्या फिल्मी करिअरपेक्षा सूरज जिया खानच्या आत्महत्या प्रकरमामुळे जास्त चर्चेत असतो. अलीकडेच सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या वेळी त्याचं नाव समोर आलं होतं. त्याच्या नावाचा उल्लेख एवढा वाढला की त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं. आता सूरज पांचोलीने स्वतः सांगितलं की त्याला यापुढे सिनेसृष्टीत काम मिळवणं खूप अवघड आहे.

२०१५ मध्ये ‘हीरो’ सिनेमातून सूरजने अथिया शेट्टीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर, त्याने २०१९ मध्ये ‘सॅटेलाइट शंकर’ सिनेमात काम केलं. एका मुलाखतीत सूरजने मान्य केलं की, आता त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळवणं फारच अवघड आहे. दरम्यान, सूरज हा जिया खानच्या आत्महत्ये प्रकरणात आरोपी आहे. सूरज म्हणाला की, सिनेसृष्टीतील काही लोक त्याचासोबत काम करण्यास तयार होते. पण गेल्या सात वर्षात जियाच्या आत्महत्येचा खटला संपला नसल्यामुळे लोक त्याच्यासोबत काम करणं टाळत आहेत.

लग्नाच्या ७ दिवसांमध्येच आदित्य नारायणने बायकोला सांगितलं, ‘जमत नसेल तर माहेरी जा’

असं असलं तरी, कितीही अडचणी आल्या तरी सूरज त्याचा संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचा म्हणाला. काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणातही सूरजच्या नावाची चर्चा झाली होती. एका नाइटक्लबमध्ये सूरज आणि सुशांत यांच्यात भांडण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, सूरजने त्याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.