News

राज्यात पुढील महिन्यापासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण!

कोल्हापूर: राज्य सरकारमार्फत पुढील महिन्यापासून जिल्ह्यात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. खासगी आरोग्य सेवतील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी, शहर आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. ( Covid Vaccination In Maharashtra Latest News Update )

वाचा: महाराष्ट्रात करोनाचा वेग मंदावतोय; रिकव्हरी रेट वाढला

कोविड-१९ लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात गुरुवारी झाली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई आदी उपस्थित होते.

वाचा: करोनाचा जोर ओसरताच CM ठाकरे फिल्डवर; दौऱ्यांचा धडाका सुरू

नोडल अधिकारी डॉ. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ५ लाख ५७ हजार १७६ लाभार्थी पहिल्या टप्प्यासाठी आहेत. जिल्ह्यात एकूण १२२ शीतसाखळी केंद्रे आहेत.

वाचा: Explainer करोना लस दिल्यानंतर एलर्जी; जाणून घ्या लक्षणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.