News

पाहा: भरधाव कारने आंदोलकांना उडवले; काहीजण जखमी

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन भागात दुपारच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका आंदोलनाच्या मोर्च्यात भरधाव वेगाने कार घुसली. आरोपीने जवळपास सहा ते आठ आंदोलकांना उडवले. काहीजण गंभीर जखमी झाले असून कार चालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. मिडटाउन मॅनहॅटनजवळील ३९ स्ट्रीट आणि थर्ड एवेन्यू कॉर्नरवर जवळपास ५० च्या आसपास आंदोलक जमा झाले होते. त्यावेळी एक भरधाव बीएमडब्लू कार या आंदोलनात घुसली. ही कार अनेकांना धडकून पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना किरकोळ दुखापत असून कोणीही गंभीर नाही. मात्र, कितीजणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

वाचा:अमेरिकेचा मोठा निर्णय! ‘फायजर’च्या लशीला मंजुरी, पण…

वाचा: विमान प्रवासात डायपरचा वापर करा; ‘या’ देशाचा कर्मचाऱ्यांना आदेश

वाचा: काळजी घ्या! ‘या’ आजारामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू

अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषी आंदोलनचा एक भाग म्हणून हे आंदोलन जमले होते, असे वृत्त काही स्थानिक माध्यमांनी दिले आहे. तर, अमेरिकेच्या इमिग्रेशन अॅण्ड कस्टम इन्फोर्समेंटने योग्य कागदपत्रे नसल्यामुळे नऊजणांना अटक केली आहे. या नऊजणांनी तुरुंगात उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू होते, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या छायाचित्रकाराने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.