News

वाढदिवशी युवराज म्हणाला, वडिलांच्या वक्तव्यामुळे दुःखी आणि निराश झालो

नवी दिल्ली: भारताचा माजी अष्ठपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग (statement,yuvraj singh birthday ) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. युवराजने सोशल मीडियावर घोषणा केली की, या वर्षी वाढदिवस साजरा करण्या ऐवजी आशा करतो की शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला वाद लवकर कमी व्हावा. त्याच बरोबर युवराजने वडीलांनी केलेल्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले.

वाचा- गोलंदाजाने केले धडाकेबाज अर्धशतक, भारतीय फलंदाज टाळ्या वाजवत राहिले

काही दिवसांपूर्वी युवराजचे वडील योगराज यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेळाडूंनी पुरस्कार परत करावेत असे वक्तव्य केले होते. युवराजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, निश्चितपणे शेतकऱ्यांमुळे देश आहे. मला वाटते की शांततेने चर्चा करून मार्ग निघेल.

वाचा- विश्वास बसणार नाही अशी फिल्डिंग; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

या वर्षी माझ्या वाढदिवसा दिवशी एकच इच्छा की जल्लोष करण्याऐवजी शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चा लवकर निकाली निघो, असे युवराजने म्हटले आहे.

त्याच बरोबर मी मिस्टर योगराज सिंग यांनी दिलेल्या वक्तव्यापासून दुखी आणि निराश आहे. मी हे स्पष्ट करतोय की, ते वक्तव्य त्याचे वैयक्तीक असून माझी मते त्याच्या सारखी नाहीत. योगीराज यांनी केंद्राने शेतकऱ्यांची मागणी ऐकण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर खेळाडूंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुरस्कार परत करावेत असे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.