News

अयोध्येतील राम मंदिर खूपत असल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन

लखनऊ: अयोध्येत राम मंदिर (ram mandir ayodhya) बांधण्यात येणार असल्याने विरोधकांना ते सहन होत नाहीए. म्हणूनच ते कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवून आंदोलन (farmers protest) करत आहेत, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( yogi adityanath ) म्हणाले. शेतकर्‍यांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचण्यासाठी भाजप ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयोजित करत आहे. याच संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी आज बरेलीत आयोजित शेतकरी मेळव्यात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिराचं बांधकाम सुरू केलं आहे, हे विरोधकांना सहन होत नाहीए. म्हणूनच ते शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन करत आहेत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

अयोध्येत भव्य राम मंदिर व्हायला हवे की नको, तुम्ही सांगा? मोदींनी हे योग्य काम केलं आहे की नाही? तुम्ही पाठिंबा देताय का? मग बोल…. जय श्री राम, असं शेतकऱ्यांना संबोधित करता योगी म्हणाले.

‘काश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्याने विरोधक नाराज आहेत. यामुळे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना चिथावत आहेत. कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरमधील फुटीरतावाद संपेल आणि तिथे तुम्हाला जमीनही खरेदी करता येईल. पंतप्रधान मोदींनी तुम्हाला जो अधिकार दिला आहे ते चांगलं काम आहे ना? पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणार ना? मग बोला भारत माता की जय’, असं म्हणत योगींनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘अहंकाराला ठेच पोहोचू नये म्हणून सरकारची सुप्रीम कोर्टात धाव’

दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांनी विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या

नवीन कृषी कायद्यांमुळे खासगी क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर मिळेल. शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय बाहेरही विकू शकेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.