News

रोजगार वाढले ; ऑक्टोबरमध्ये ११ लाख ५५ हजार नव्या नोकऱ्या

नवी दिल्ली : करोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असून ऑक्टोबरमध्ये नव्या नोकऱ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेत (ईपीएफओ) ऑक्टोबरमध्ये ११ लाख ५५ हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. यामुळे अर्थव्यवस्था सावरत असल्याचे दिसून आले आहे.

नव्या करोना व्हायरसची दहशत; सेन्सेक्स २००० अंकांनी कोसळला, पाच लाख कोटींचे नुकसान
कोविड महामारी असून सुद्धा चालू आर्थिक वर्षात ईपीएफओमधे एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंत सुमारे ३९ लाख ३३ हजार सभासदांची भर पडली आहे. या महिन्यात जे सदस्य नव्याने सामील झाले आहेत आणि त्यांच्या वेतनातील योगदान ईपीएफओला मिळाले आहे असे ११ लाख ५५ हजार नवीन कामगार आहे.

खबरदारी घ्यावीच लागणार ; करोना लस घेतली तरी मास्कपासून सुटका नाही
गेल्या काही वर्षांची तुलना पाहिल्यास असे दिसून आले आहे की, ऑक्टोबर २०२० या महिन्यात वेतनवाढीच्या तुलनेत जोमदार अशी ५६ टक्के वाढ नोंदवली गेली असून एकूण सभासदांच्या संख्येत २०१९ च्या तुलनेत ७ लाख ३९ हजार कमर्चाऱ्यांची नोंदणी झाली आहे, ज्यामुळे कोविड आधीच्या काळापेक्षाही भरीव वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२० या महिन्यात २ लाख ८ हजार महिला कर्मचाऱ्यांची भर पडली. ऑक्टोबर २०२० महिन्यातील नवीन महिला वर्गणीदारांच्या संख्येचा वाटा २१ टक्के आहे.

आयपीओ गुंतवणूक ; ‘अँटनी वेस्ट हँडलिंग सेल’ची समभाग विक्री योजना
ऑक्टोबर २०२० या महिन्यात ७ लाख १५ हजार नवीन सदस्य ईपीएफओत सामील झाले, तर अंदाजे २ लाख ४० हजार सदस्य कमी झाले. अंदाजे ६ लाख ८० हजार सदस्य सोडून गेले आणि तेच नव्याने सामील झाले म्हणजे त्यांनी ईपीएफओ आस्थापनेअंतर्गत नोकऱ्या बदलल्या पण त्यांनी आपला हिशोब पूर्ण करून निधी परत घेण्याऐवजी खात्यावरील निधी हस्तांतरीत करून सदस्यत्व कायम ठेवले. सदस्यत्व सोडलेल्यांच्या संख्येवरून असे दिसून आले आहे की भारतात कोविड रुग्णसंख्या कमी झाली असल्याने कर्मचारी कामावर परत येत आहेत.

नोकरी मिळवण्याच तरुणांची संख्या लक्षणीय
ऑक्टोबरमध्ये पीएफ वर्गणीदारांमधे ५० टक्के वाढ झाली असून ते १८ ते २५ या वयोगटातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये रोजगारात वाढ होत असून एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत सर्व वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या निव्वळ वेतनात ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.