News

त्या ५ जणांचे अहवाल बाकी; जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे महत्त्वाचे आवाहन

नगर:ब्रिटन येथून आलेल्या प्रवाशांपैकी २५ जण नगरमध्ये आल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. राज्य सरकारकडून मिळालेल्या यादीनुसार या सर्वांचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यातील २० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला आहे. उरलेल्या पाच जणांचा अहवाल येणे बाकी आहे, मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. ( Britain New Coronavirus Strain News )

वाचा: लंडनहून औरंगाबादेत आलेल्या महिलेला करोना; NIVच्या अहवालाची प्रतीक्षा

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवीन स्टेंट आढळून आल्यानंतर राज्यात काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून युरोपातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून घेण्यात येत आहे. यासंबंधी माहिती देताना नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले, ‘शासनाला मिळालेल्या याद्यांनुसार आतापर्यंत २५ जण नगर जिल्ह्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यातील १९ जण नगर शहरात तर उरलेले सहा ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय नगरचा पत्ता असलेले काही प्रवासी मुंबईतच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहेत. नगरमध्ये आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उरलेल्या पाच जणांचे अहवाल अद्याप प्राप्त व्हायचे आहेत. मात्र, त्या पाचही जणांत करोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. नवा स्टेंट शक्तिशाली नसल्याचे अहवाल समोर आलेले आहेत. शिवाय आता युरोपातून येणारी विमाने बंद असल्याने यापुढे कोणी येण्याची शक्यता नाही. जर नागरिकांना अशी कोणाबद्दल माहिती मिळाली, तर ती प्रशासनाला कळवावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी,’ असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

वाचा: नव्या वर्षात पहिल्या ८ दिवसांत सर्वांसाठी लोकल?; CM ठाकरे यांनीच घेतला पुढाकार!

नगरचा करोना मृत्यू दर राज्यापेक्षा खूपच कमी आहे. आतापर्यंत हजारावर मृत्यू झाले असले तरी मृत्यू दर १.५ टक्केच आहे. राज्याचा हाच दर २.६ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६८ हजार २९१ जणांना करोनाची लागण झाली. सध्या ११२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नव्याने १२५ रुग्ण दाखल झाले असून नव्याने दाखल होणाऱ्यांची संख्याही थोडी घटली आहे.

वाचा: एकनाथ खडसे यांना अखेर ईडीची नोटीस मिळाली; केले ‘हे’ मोठे विधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.