News

दोन मुलांच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, ४ वर्षांनंतर…

रीवा: मध्य प्रदेशातील रीवा येथील एका महिलेला लग्नाच्या भूलथापा देत तिच्यावर चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला शहडोल जिल्ह्यातील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाच्या भूलथापा देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता लग्नाला नकार देत आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

महिलेचे २०११मध्ये लग्न झाले आहे. तिला दोन मुले आहेत. पती तिचा छळ करत होता. त्याचदरम्यान, महिलेचे सोशल नेटवर्किंग साइटवर रीवा येथील धनेंद्र मिश्रा याच्यासोबत मैत्री झाली. त्यानंतर फोनवर दोघे गप्पा मारू लागले. त्या दोघांची चांगली मैत्री झाली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरूणाने चार वर्षे महिलेचे लैंगिक शोषण केले. मात्र, आता लग्नाला नकार देत आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

२३ वर्षीय तरूणी रिक्षातून प्रवास करत होती, काही वेळाने…

अखेर महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने महिलेच्या दोन मुलांना सांभाळण्याचे वचन दिले. महिलेला विश्वासात घेतल्यानंतर ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली गेली. तिच्यासोबत चार वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, आता लग्नाला नकार देत तिची फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

धक्कादायक! तरुणीचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.