News

Video: षटकार मारलेला चेंडू लागला लहान मुलीला; पाहा फलंदाजाने काय केले

वेलिंग्टन:fastest century in women’s t20 cricket न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डिव्हाइन (sophie devine )ने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले. गुरुवारी झालेल्या सामन्यात सोफीने ३६ चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत तिने ९ षटकार आणि ९ चौकार मारले. सोफीने १०८ धावा केल्या.

वाचा- धमाकेदार फलंदाजी; भारतीय खेळाडूंने टी-२० क्रिकेटमध्ये केला वर्ल्ड रेकॉर्ड

सुपर स्मॅश स्पर्धेत वेलिंग्टन ब्लेजकडून खेळताना सोफीने ओटागो स्पार्कविरुद्ध ही कामगिरी केली. तिच्या या खेळीमुळे वेलिंग्टनने १० विकेटनी विजय मिळवला. सोफीने वेस्ट इंडिजच्या डॅड्रा डॉटिनचा २०१० सालचा विक्रम मोडला. डॅड्राने ३८ चेंडूत शतक पूर्ण केले होते. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेले आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूत शतक झळकावले होते.

वाचा- मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या अझरला प्रत्येक रनसाठी मिळणार इतके रुपये…

वाचा- ‘गावस्कर तुम्ही काहीही बोला, मला फरक पडत नाही’

सोफीच्या या वादळी खेळीत एक दुर्घटना घडली. तिने मारलेला एक चेंडू स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एका छोट्या मुलीच्या डोक्यावर पडला. सुदैवाने त्या मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही. पण सामना झाल्यानंतर सोफीने जे काही केल्या त्याने सर्वांची मने जिंकली.

वाचा- चौथी कसोटी सुरू होण्याच्या २४ तास आधी ऑस्ट्रेलिया बसला मोठा धक्का

सामना झाल्यानंतर सोफी त्या मुलीला भेटली आणि स्वत:ची कॅप दिली. तसेच तिच्या सोबत फोटो देखील काढला. न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते सोफीचे कौतुक करत आहेत.

वाचा- इंग्लंडच्या क्रिकेटपटूला करोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण; श्रीलंकेत खळबळ उडाली

वाचा- ‘ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजात दम नाही, कसोटीत भारताचा अश्विन करू शकतो हा विक्रम’

सोफीच्या धमाकेदार शतकामुळे वेलिंग्टन संघाने ओटोगाने दिलेले १२९ धावांचे आव्हान ८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. येत्या २३ फेब्रुवारीपासून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या महिला संघात तीन सामन्यांची वनडे, त्यानंतर टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिकेतील सामने २३,२६ आणि २८ फेब्रुवारी रोजी तर टी-२० लढती या ३,५,७ मार्च रोजी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.