News

२६ वर्षीय घटस्फोटित महिलेला घरी बोलावले, खोलीत डांबून केला बलात्कार

हायलाइट्स:

  • पीडित महिला घटस्फोटित असून, एक मुलगाही आहे
  • घराच्या भाडेकराराची कागदपत्रे घेण्यासाठी घरी बोलावले
  • खोलीत डांबून महिलेवर केला बलात्कार
  • हरयाणातील हिसारमध्ये घडली धक्कादायक घटना

हिसार: हरयाणाच्या हिसारमध्ये २६ वर्षीय घटस्फोटित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात एका २६ वर्षीय घटस्फोटित महिलेने तक्रार नोंदवली आहे. एका व्यक्तीने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. महिला घटस्फोटित असून, घर भाडेतत्वावर घेत होती. करार करण्यासाठी ती कोर्टात गेली होती. तिथे तिची ओळख शमशेर सिंह नावाच्या व्यक्तीशी झाली. भाडेकरार तयार करून देणार असल्याची बतावणी त्याने केली आणि त्याचा मोबाइल क्रमांकही तिला दिला. ११ फेब्रुवारीला त्याने मला कोर्ट परिसरात बोलावून घेतले. माझे घरही दाखवतो असे त्याने सांगितले. आरोपीने तिला सेक्टर १५ मधील घर दाखवण्यासाठी नेले. घर बघितल्यानंतर चहा घेऊन ती निघून गेली.

साडेचार वर्षांचा ऋतिक बेपत्ता झाला होता, १५ दिवसांनंतर झाला धक्कादायक खुलासा

महिला भाडेकरारासंबंधित कागदपत्रे तिथेच विसरली होती. १२ फेब्रुवारीला त्याने पुन्हा घरी बोलावले. त्यानंतर खोलीत डांबले. तिथे त्याने बलात्कार केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने महिलेला धमकावले. मुलालाही ठार मारेन अशी धमकी दिली. तसेच एक लाख रुपये देतो असे सांगून प्रकरण मिटवून टाक असेही सांगितले. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई: रेल्वे स्थानकात दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा, उद्घोषक महिलेवर हल्ला, तोडफोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.