News

Video: पहिल्याच टी-२० मध्ये झाला राडा; वॉशिंग्टन सुंदर आणि बेयरस्टो भिडले

अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० लढतीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. या लढतीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

वाचा- पराभवानंतर क्रिकेटपटू म्हणाला, भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ अनेक पटीने चांगला

पहिल्या वनडेत इंग्लंडने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १२४ पर्यंत मजल मारली. विजयाचे लक्ष्य इंग्लंडने १५.३ षटकात २ विकेटच्या बदल्यात पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

वाचा- अतिउत्साहात भारतीय संघावर टीका करणाऱ्या मायकल वॉनला जाफरचे झणझणीत उत्तर

इंग्लंडच्या डावात भारताकडून १४वे षटक वॉशिंग्टन सुंदर टाकत होता. सुंदरने डेव्हिड मलानला चेंडू टाकला त्याने तो फ्रंट फुटच्या दिशेने मारला. तेव्हाच नॉन स्ट्रायकल दिशेने उभा असलेल्या जॉनी बेयरस्टो धाव घेण्यासाठी थोडा पुढे आला. चेंडू बेयरस्टोच्या दिशेने येत होता. तेव्हाच सुंदर देखील चेंडू पकडण्यासाठी आला. यात चेंडू बेयरस्टोच्या हेल्मेटला लागला आणि सुंदरची आणि बेयरस्टोची धडक झाली.

वाचा- विराट शून्यावर बाद झाला, पोलिसांनी शेअर केला हा फोटो आणि मेसेज

यावर सुंदरच्या बेयरस्टोवर ओरडला. त्यावर दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दीक चकमक झाली. पण अंपायल नितीन मेनन यांनी तातडीने या दोघांच्या वादात लक्ष घेतले आणि वाद मिटवला.

वाचा- भारताच्या पराभवापेक्षा चर्चा हार्दिक पंड्याच्या शॉर्टची; ICCने केले कौतुक, पाहा व्हिडिओ

वाचा- भारतीय खेळाडूची फिल्डिंग पाहून बटलरला विश्वास बसला नाही, पाहा व्हिडिओ

वॉशिंग्टन सुंदर हा मैदानावर शांत असतो. पण पहिल्या सामन्यात सुंदरला प्रथमच अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.