News

सरकारी बँंकांचे खासगीकरण;अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

हायलाइट्स:

  • बँकांच्या खासगीकरणावरून कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
  • काही बँका संकटग्रस्त असून ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम नाहीत.

नवी दिल्ली : बँकांच्या खासगीकरणावरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या केंद्र सरकारची त्यामागची भूमिका आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पात आयडीबीआयसह दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली होती. मात्र त्याला विरोध म्हणून कालपासून देशभर बँक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे.

सोने-चांदीवर दबाव ; जाणून घ्या आज सोने किती रुपयांनी महागले
बँकांच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकार ठाम आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत सीतारामन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट केला. सीतारामन म्हणाल्या की काही बँका चांगली कामगिरी करत आहेत तर काही बँकांची कामगिरी सामान्य आहे. मात्र काही बँका संकटग्रस्त असून ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम नाहीत. अशा वेळी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यास बँक सक्षम असावी हा सरकारचा हेतू आहे. त्यातून बँकांचे एकत्रीकरण देखील करण्यात आले. ज्यातून मोठ्या ग्राहकांच्या गरजा त्या बँका पूर्ण करू शकतील, असे सीतारामन यांनी सांगितले.

वाचा : चिकन, दूध महागणार; महागाईची झळ कायम
पुढे सीतारामन यांनी स्पष्ट केले की वित्त सेवा क्षेत्रात सरकारी बँका आहेत आणि पुढे राहतील. सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या बँका सध्या निधी उभारण्यास आणि व्यवसाय करण्यास संघर्ष करत आहेत, अशा बँकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. ज्या बँकांचे खासगीकरण होणार आहे, अशा बँका पुढे आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतील आणि ग्राहकांना सेवा देतील याकडे सरकारचे लक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.

चेक क्लिअरिंग ठप्प! संपामुळे पहिल्याच दिवशी १६५०० कोटीचे चेक व्यवहार रखडले, आजही संप सुरुच राहणार
सध्या बँक कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र सरकारने बँकांची विक्री करून खासगीकरण करायला लावले आहे, असे मानणे योग्य नाही, असे सीतारामन यांनी सांगितले. खासगीकरणानंतर कमर्चाऱ्यांवर कोणतेही गंडांतर येणार नाही. त्यांची नोकरी,पगार , पेन्शन याची सरकार काळजी घेईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.