News

कोहलीला दाखवून द्यायचं आहे की…; जेम्स अँडरसननं सांगितली मन की बात

द ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्याने दोन्ही संघ आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करतील. आतापर्यंतच्या तीन कसोटींमध्ये दोनवेळा भारतीय कर्णधार विराट कोहलीला बाद करणाऱ्या इंग्लंडच्या वेगवान लंदाज जेम्स अँडरसनने त्याच्या मनातील गोष्ट उघड केली . विराट कोहलीला बाद करणं खूप स्पेशल गोष्ट असते असं तो म्हणाला. तसेच कोहलीला बाद करण्याचा अर्थ काय होतो, हे देखील दाखवून द्यायचं आहे.

अँडरसन आणि कोहली यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान काही वाद झाला होता. त्यानतंर तिसऱ्या कसोटीत अँडरसनने घातक गोलंदाजी करत भारतीय संघाचा पहिला डाव ७८ धावांत गुंडाळला होता.

‘द टेलीग्राफ’च्या एका स्तंभात अँडरसन म्हणाला की, “जेव्हा मी लीड्समध्ये पहिल्या डावात कोहलीला बाद केले, तेव्हा माझ्या मनात खूप भावना दाटल्या होत्या. मला वाटते की त्याची विकेट घेणे विशेष गोष्ट आहे, कारण तो एक चांगला खेळाडू असून भारतीय संघाचा कर्णधारही आहे. त्याला बाद करण्याचा आमच्यासाठी काय अर्थ होतो, हे मी त्याला दाखवू इच्छितो.

अँडरसन पुढे म्हणाला की, “आमचा उद्देश भागीदारीत गोलंदाजी करणे हा होता. तसेच भारताच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे, हे आमच्यासाठी एक चांगले उदाहरण होते. मी कोहलीला १२ चेंडू टाकले, त्यापैकी १० चेंडू त्याने मागे सोडले. कोहली त्याच्या फॉर्ममध्ये यावा, अशी माझी इच्छा नव्हती.”

धावांसाठी कोहलीचा संघर्ष
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गेल्या तीन कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठी खेळी केलेली नाही. या दौऱ्यात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ५५ धावा एवढी आहे. तसेच विराटने २०१९ पासून शतक झळकावलेलं नाही. त्यामुळे तो शतकाचा दुष्काळ कधी संपवेल, याची प्रत्येकजण वाट पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.