News

आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

हायलाइट्स:

  • आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ
  • अडसूळ यांना दिलासा देण्यास कोर्टाचा नकार
  • पुढील सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब

मुंबईः सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. त्याविरोधात अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात अडसुळांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी तसंच, याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसूळ यांनी न्यायालयाला केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अडसूळ यांना तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला आहे.

वाचाः पुण्याच्या रुग्णालयात नगरचे ४० टक्के रुग्ण; अजित पवारांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई उच्च न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांच्या याचिकेत सुधारणा करण्याची मुभा देत उच्च न्यायालयाने सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.

आनंद अडसूळांवर आरोप काय?

आनंद अडसूळांवर सिटी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत २७ शाखा असलेल्या सिटी सहकारी बँकेवर घोटाळ्यामुळे सन २०१८पासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. आनंद अडसूळ हे या बँकेचे अध्यक्ष असून, अभिजित अडसूळ हे संचालक आहेत. नियमबाह्य कर्ज दिल्यानेच ही बँक घोटाळ्यात अडकली व त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा ईडीचा संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने तपास सुरू केला आहे.

वाचाः कार चालकानं अचानक युटर्न घेतल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; पाहा अपघाताचा थरारक व्हिडिओ

ईडीला संशय काय?

सिटी सहकारी बँकेने दिलेली कोट्यवधींची कर्जे बुडीत खात्यात गेली. त्यामुळेच या घोटाळ्यात अडसूळ यांचा नेमका सहभाग काय होता, यासंबंधी चौकशीसाठी अडसूळ पिता-पुत्रांना चौकशीचे समन्स बजाविण्यात आले होते. परंतु, दिल्लीत बैठक असल्याचे सांगून हे दोघेही उपस्थित राहिले नाहीत. सिटी सहकारी बँकेत जवळपास ९० हजार ठेवीदार आहेत. या ठेवीदारांना विम्यांतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. यासंबंधीचा निर्णय अलीकडेच झाल्याने आता ही बँक अवसायनात निघणार, हे निश्चित झाले आहे.

वाचाः ‘नाना पटोले अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतही बोलू शकतात’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.